26.3 C
New York
Saturday, August 2, 2025

Buy now

गोपुरी आश्रमात टेबल टेनिस प्रशिक्षणास प्रतिसाद

कणकवली : गोपुरी आश्रमातर्फे टेबल टेनिस प्रशिक्षण १ ते १० जून कालावधीत घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विद्यार्थ्यांना टेबल टेनिस या खेळाची ओळख व्हावी, शालेय स्पर्धा व इतर स्पधार्साठी खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने गोपूरी आश्रमातर्फे टेबल टेनिस कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विद्यार्थ्यांना नितीन तळेकर यांनी खेळाचे प्रशिक्षण दिले. महासिंधू टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष व प्रशिक्षक विष्णू कोरगावकर व त्यांचे सहकारी पिंगुळकर, वालकर, मालवणमधील खेळाडूंनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी सिंधुदुगातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू घडावेत, यासाठी महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन कडून सर्वतोपरी सहाय्य करू, असे आश्वासन श्री. कोरगावकर यांनी दिले. हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर व सचिव विनायक मेस्त्री यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!