16.5 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

मनसे कडून अपंग व्यक्तीस व्हीलचेअर

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य 

मसुरे : राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आडवली- तालुका मालवण येथील अपंग व्यक्तीस व्हीलचेअर देण्यात आली. वय 45 वर्ष असणाऱ्या आणि शारीरिक दृष्ट्या 65% अपंग असणाऱ्या कुमारी रूपा लाड आई-वडिलांच्या सोबत राहते. चालता येत नसल्याने उचलून घेऊन आधार देत तिचे दिनक्रम करावे लागत. आई-वडील रुद्ध असल्याने व घरी कोण आणखी व्यक्ती नसल्याने गैरसोय होत होती. याविषयी त्यांनी कुटुंबीयांनी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्याकडे व्हीलचेयर ची मागणी केली होती. राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना ही व्हीलचेअर त्यांच्या घरी जाऊन त्यांना देण्यात आली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर,जिल्हा सचिव बाळा पावसकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते. या प्रसंगी कुटुंबीयांनी राज साहेब ठाकरे यांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!