सिंधुदुर्ग : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगामी सण – उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हयगय न करता आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्यातील नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. त्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच कोस्टल पोलिस स्टेशन बाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आणि पोलीस विभागाने एकत्रितपणे काम केल्यास जिल्हा अधिक सक्षम व सुरक्षित होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या बैठकीस पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.