अनेक गावं अंधारात ; सर्वत्र लाईन फॉल्ट असल्याचे कारण
कणकवली : मागील काही दिवस पाऊस कोसळत आहे. अशातच महावितरण विभागाची पूर्वतयारी किती असते याचे दर्शन घडले. त्यानंतर काही दिवस पावसाने काहीशी उत्संत घेतली होती. गुरुवारी आणि शुक्रवारी ( आज ) पुन्हा पावसाने सुरुवात केली. मात्र शुक्रवारी चार तास लागलेल्या पावसात महावितरण विभाग दुसऱ्याही परीक्षेत नापासच झाले आहे. त्यामुळे कणकवली शहरानजीक असलेली अनेक गावे अंधारात आहेत. मात्र अनेक प्रयत्न करूनही एवढे दिवस सुशेगात राहिलेल्या महावितरण विभागाला फॉल्ट निर्माण झाल्यावर च काही ठिकाणी सफसफाई किंवा विद्युत वाहिन्या बदलणे, डिओ बदलणे, फ्युज बदलणे, यासारखी कामे आठवू लागली आहेत. त्यामुळे ग्राहकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.