-9.5 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

कोल्हापुरात ढगफुटी सदृश्य पाऊस

कोल्हापूर : शहरात सायंकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडासह पावसाने जोरदार हजेरी लावली. नाले, गटारातील पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यातूनच काही वाहनधारक वाहतूक करत होते.

ढग दाटून आल्याने सायंकाळी ४ नंतर अचानक काळोख पसरला. ढगांच्या गडगडासह विजा चमकू लागल्या अन् जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानकच ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने विक्रेत्यासह, नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अवघ्या अर्ध्या तासात शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते. पावसाचा जोर असल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती.

हवामान खात्याने राज्यात आज, गुरुवार पासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली होती. पुढील पाच दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, विशेषतः शनिवार दि. १४ ते सोमवार दि. १६ जून ह्या तीन दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!