कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर या वकिली पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. नगरपंचायतीच्या उच्च शिक्षित पहिल्या नगराध्यक्षा म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर गेले पाच वर्ष कायद्याचे शिक्षण घेत होत्या. पाचव्या वर्षाची अंतिम परीक्षा नुकतीच पार पडली. त्याचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर या उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या वकीली पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्याना पहिल्या उच्चशिक्षित नगराध्यक्षा बनण्याचा बहुमान मिळवला आहे.