कार्यमुक्त करताना पोलीस ठाण्याच्यावतिने दिल्या शुभेच्छा
कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे यांची पालघर येथे बदली झाली. मागील तिन ते चार वर्ष ते कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अनेक नाजूक प्रकरणे त्यांनी हाताळली होती. त्यांची पालघर येथे बदली झाल्याने कणकवली पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाणचे, महेश शेडगे आदी उपस्थित होते.