बालकांच्या लैंगीक अत्याचार व ऍट्रॉसिटी गुन्ह्यांतर्गत एकाला अटक ; पोलीस कोठडी
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातील एका युवकाने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून लैंगीक अत्याचार केल्याबाबत दीप उर्फ गोट्या तुकाराम खोचरे (२१, हरकुळ बुद्रुक) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही घटना चार महिन्यांपूर्वीच्या कालावधीत घडली असून पिडीत मुलीने मंगळवारी ( दि. १० मे ) रोजी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातील त्या युवकाला पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. रूपेश देसाई यांनी काम पाहीले.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, पिडीत मुलगी व संशयित दीप यांची स्नॅपचॅटच्या या ॲपवर ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात अनेकदा भेटीगाठी झाल्या. त्यात मागील चार महिन्यांच्या कालावधीत दीप याने मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगीक अत्याचार केले, अशी फिर्याद मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेमध्ये ऍट्रॉसिटीचे कलम असल्याने तपास उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव करत आहेत.