शिवसेना पदाधिकाऱ्यांची ग्रामीण रुग्णालयास भेट
मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना तत्पर सेवा मिळाली पाहिजे. यासाठी अधिकाधिक सेवा सुविधा मालवण ग्रामीण रुग्णालयाला उपलब्ध करून देण्यासाठी आमदार निलेश राणे प्रयत्नशील आहेत. अत्यावश्यक असलेल्या काही सुविधा श्री. राणे स्वखर्चाने तात्काळ उपलब्ध करून देणार आहेत. तसेच अन्य काही धोरणत्मक स्वरूपातील निर्णय विधिमंडळ व मंत्रालय स्तरावरून मंजूर करून घेण्यात आमदार राणे यशस्वी ठरले आहेत. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.
मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना देण्यात येणारी सेवा तसेच रुग्णालयातील सेवा सुविधाचा आढावा आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, मालवण ग्रामीण रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांच्या माध्यमातून घेतला. शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, बबन शिंदे, शहरप्रमुख दीपक पाटकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, सहदेव बापर्डेकर, जॉन नरोना, राजू बिडये, अभय कदम, मंदार लुडबे, चौकेकर, अरुण तोडणकर, बाबू धुरी, आबा शिर्सेकर, ऋषिकेश सामंत, दादा वेंगुर्लेकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, जयमाला मयेकर, अंजना सामंत, महिला आघाडी मालवण तालुका प्रमुख मधुर तुळसकर, तालुका समन्वयक कवीत मोंडकर, उपतालुका प्रमुख प्रियंका मेस्त्री, अल्पसंख्याक महिला शहराध्यक्षा मालवण मार्टिना फर्नांडिस, आशा वळपी, लड्डिन फर्नांडिस, स्नेहा घाडीगावकर, रश्मी तुळसकर यांसह डॉक्टर, कर्मचारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहाणी केली. तसेच दाखल रुग्णांची विचारपूस केली. मालवण ग्रामीण रुग्णालयात मालवण ग्रामीण रुग्णालयात सात वैद्यकीय अधिकारी सेवा देत आहेत. ओपीडी चांगली आहे. औषध साठा पुरेसा आहे. तसेच अत्यावश्यक स्थितीत रुग्णांना गरजेची औषधे उपलब्ध करून दिली जातात. याबाबत माहिती घेताना रुग्णांना कोणतीही समस्या निर्माण होता नये तत्पर सेवा रुग्णांना मिळावी या दृष्टीने आमदार निलेश राणे यांच्या सूचना आहेत. ज्या काही आवश्यक गरजा आहेत त्या सांगा त्या सर्व उपलब्ध करून दिल्या जातील. ज्या समस्या आहेत त्या मार्गी लावल्या जातील. असे दत्ता सामंत यांनी सांगितले. रुग्णालयात काही बाबी गेल्या दहा वर्षात झाल्याच नाहीत. येथील रुग्णालयाय सीसीटीव्ही यंत्रणा आवश्यक असून त्या माध्यमातून रुग्णालयातील सेवेवर लक्ष ठेवणे नियंत्रण ठेवणे सुलभ होते. मात्र हे काम गेली अनेक वर्षे प्रस्तावित होते याबाबत माहिती मिळताच आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयात सीसीटीव्ही यंत्रणा स्वखर्चाने उपलब्ध केली जाईल. त्यासोबत फिल्टर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बेडसीट, चादर, रुग्णालयातील बाथरूम, बेसिन येथील स्वच्छता व अन्य बेसिक बाबतीत जे काही आवश्यक असेल ते सर्व उपलब्ध केले जाईल. डेंटल सेवे बाबतही भुमिका मांडण्यात आली. इमारतीला काही ठिकाणी गळती लक्षात घेता इमारतीवर लोखंडी शेड उभारली जाईल. महत्वाचे म्हणजे तज्ञ डॉक्टर सेवा, औषधं साठा हे प्राधान्य क्रमात राहील. रुग्णांना कोणतीही समस्या निर्माण होता नये. याकडे आमदार राणे यांनी विशेष लक्ष दिले आहे. असे दत्ता सामंत यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनात मालवण ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ व सर्व डॉक्टर चांगली सेवा बजावत आहेत. असे सांगत दत्ता सामंत यांनी डॉक्टरांचे विशेष कौतुक केले. मालवण ग्रामीण रुग्णालयात दोन डायलेसीस युनिट माध्यमातून रुग्णांना सेवा दिली जाते. मात्र काहीवेळा रुग्णांची संख्या अधिक असल्याने डायलेसीस युनिट वाढवण्याची आवश्यकता आहे. ही मागणी आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावली जाईल. तसेच रुग्णालयात अस्तिरोग तज्ञ व स्त्रीरोगतज्ञ रुग्णसेवेसाठी उपलब्ध होत असतात. मात्र कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ञ व सर्जन नियुक्त व्हावेत या दृष्टीने मंत्रालय सतरावर, आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरु असल्याचे सांगण्यात आले.