27.9 C
New York
Thursday, June 12, 2025

Buy now

अस्वलाच्या हल्ल्यात तरुण जखमी | मांगेली येथील घटना

दोडामार्ग : तालुक्यातील दुर्गम भागातील जंगलात रानटी प्राण्यांचा उपद्रव वाढतच आहे. वटपौर्णिमा सणा निमित्त बागेत फणस काढण्यासाठी गेलेल्या मांगेली फणसवाडी येथील विष्णू लाडू गवस ४९ या तरुणावर अस्वलाने हल्ला करून जखमी केले. मात्र आरडाओरड केल्याने अस्वलाने पळ काढला.

तरुणाचा मांडीवर अस्वलाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉ अनिकेत गुरव यांनी प्राथमिक उपचार करून गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, मांगेली गावातील युवक महिलांचा वटपौर्णिमेचा सण असल्याने त्यासाठी विष्णू गवस हे जंगलात फणस काढण्यासाठी गेले होते. फणसाच्या झाडाच्या बाजूला अस्वल फणस खात होते हे त्यांना दिसून आले नाही. फणस काढण्यासाठी फणसाच्या झाडाखाली गेले तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी झडप घेतली. त्यावेळी आपला जीव वाचवीण्यासाठी पळू लागले असता अस्वलाने गवस यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर हाताने ( पंजाने ) मारा केला. याली अस्वलाची धार धार नखे मांडीवर लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला यावेळी त्यांनी आपला जीव वाचविण्यासाठी आरडा ओरड केली. त्यावेळी अस्वलाने पळ काढली म्हणून गवस यांचे प्राण बाल बाल बचावले. रक्त वाहत असताना त्या अवस्थेत पडलेल्या विष्णू गवस यांना तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ दोडामार्ग रुग्णालयात आणले. डॉ अनिकेत गुरव यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारसाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले दिवसेदिवस जंगली हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत असताना जंगल परिसरातील अन्य प्राण्यांचा उपद्रव वाढतच चालला आहे त्यात मांगेली हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे यापुर्वीही या ठिकाणी अस्वलाने बऱ्याच जणांवर हल्ले केले होते. अस्वल थेट आता वस्ती पर्यंत दिवसा ढवळ्या फिरत असून स्थानिक ग्रामस्थ व पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना भीतीचे बनले आहे. त्यामुळे वनविभागाने याचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी आता मांगेली वासियांकडून करण्यात येत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष वेधून बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील जनतेतून होत आहे यांमुळे मांगेली धबधबा या ठिकाणी पर्यटक येत असल्याने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!