27.9 C
New York
Thursday, June 12, 2025

Buy now

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

कणकवली | मयुर ठाकूर : मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २० ते २३ जून या कालावधीत संदेश उर्फ गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळ यांच्या वतीने कणकवलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२० ते २३ या कालावधीत विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २० ते रविवार २२ जून या दरम्यान अंडरआर्म डे-नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. रविवार २२ जून रोजी सकाळी १० वा. रक्तदान शिबिर, संध्याकाळी ५ वाजता रस्सीखेच स्पर्धा, सोमवार २३ जून संध्याकाळी ७वा. दशावतारी नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रात्री ९ वा. गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!