23.6 C
New York
Friday, June 13, 2025

Buy now

कणकवली कनकनगर येथे घरफोडून चोरी करणारा चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला

सिंधुदुर्ग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

कणकवली : कणकवली शहरातील कनकनगर येथील समृद्धी कोरगावकर यांच्या घर फोडीचा छडा एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलीस स्थानकाच्या पोलीस पथकाने लावला असून अवघ्या १६ तासांत चोराला गजाआड करतानाच साडेसहा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व चोरीला गेलेला अन्य ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

संतोष वसंत सुतार (वय ४८, रा. संगमेश्वर रत्नागिरी) असे चोरट्याचे नाव आहे. सदर कारवाई एसपी डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी मारुती जगताप यांच्या सूचनेनुसार कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, एलसीबी चे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, एलसीबी पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, हवालदार पांडुरंग पांढरे, हवालदार डॉमनिक डिसोझा, हवालदार जॅक्सन घोंसालवीस, हवालदार आशिष जामदार यांच्या पथकाने केली.

कणकवली शहरातील कनकनगर येथील परिचारिका समृद्धी मिलिंद कोरगावकर ह्या शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी ७ जून रोजी नाईट ड्युटीसाठी गेल्या होत्या. तर त्यांचे पती मिलिंद हे आपल्या वडील आणि मुलासोबत आपल्या मालवण येथील बहिणीकडे गेले होते. रविवारी ८ जून रोजी सकाळी पावणे नऊ वाजता ड्युटीवरून परत आल्यानंतर समृद्धी कोरगावकर याना आपल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी झालेली दिसली. चोरट्याने साडेतीन लाखांचा ऐवज चोरल्याची फिर्याद समृद्धी कोरगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली होती. यात चोरीचा छडा लावण्यासाठी एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक चोरट्याच्या मागावर होते. मानवी कौशल्य आणि पणजी शहरात पायी गस्त घालून अवघ्या १६ तासांत चोरट्याच्या मुसक्या एलसीबी सिंधुदुर्ग आणि कणकवली पोलिसांनी आवळल्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!