12.1 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

रियांश स्पोर्ट्स तेंडोली आयोजित कबड्डी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

कुडाळ : रियांश स्पोर्ट्स तेंडोली आयोजित भव्य खुल्या वयोमर्यादित कबड्डी स्पर्धेचे शिवसेना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, कुडाळ तालुका खरेदी-विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रियांश स्पोर्ट्स तेंडोली या संस्थेच्या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आला. तसेच या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मान्यवरांची मनोगते व सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे, माजी सरपंच सचिन गावडे, तेंडोली गावचे माजी सरपंच भाऊ पोतकर आदी शाखाप्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते खेळाडू उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!