13.5 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

कुडाळात दुसऱ्या दिवशीही चोरी | पोलिसांसमोर आव्हान

कुडाळ : कुडाळ-नाबारवाडी येथील घरफोडीला २४ तास होत नाहीत तो पर्यंत कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंगुळी-काळेपाणी येथील सुरेखा पद्माकर तानावडे यांच्या बंद घराला टार्गेट करत चोरटयांनी चोरी केली आहे. या घरफोडीत रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिन्यांसह एकूण १ लाख १६ हजाराचा ऐवज चोरीस गेला आहे. याबाबत सुरेखा तानावडे यांचा भाचा नंदन विश्वनाथ गोवेकर (वय ४२, रा. पिंगुळी) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नंदन गोवेकर यांच्या मावशी सुरेखा पद्माकर तानावडे या पिंगुळी काळेपाणी येथील पेट्रोल पंपाच्या अलीकडे असलेल्या घरी राहतात. सौ. सुरेखा तानावडे या ६ जून रोजी सायंकाळी ६.३० वा मुलगा, सुन व नातवंडे यांच्यासह आपला मोठा मुलगा स्नेहल याच्या मुलाचा वाढदिवस असल्याने मुंबई खारघर पनवेल येथे गेल्या होत्या. यानंतर ७ जून रोजी दुपारी सौ सुरेखा तानावडे यांच्या बहीणीचा मुलगा नंदन गोवेकर यांना सौ सुरेखा तानावडे यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने कॉल करुन ‘तुझी मावशी हीचे घराचा दरवाजा उघडा आहे. तुझी मावशी हीने खारघर येथे घर बंद करुन जाताना घराची चावी अन्य कोणाकडे दिलेली आहे काय याबाबत खात्री करुन सांग’ असे सांगितले. त्यानंतर नंदन गोवेकर यांनी याबाबत खात्री करुन मावशी हीने आपल्या घराची चावी अन्य कोणाकडे दिली नसल्याचे सांगितले व तात्काळ १२.३० वा. चे मानाने मावशी सौ सुरेखा यांच्या घरी गेले. त्यावेळी तीचे कौलारु घराच्या लाकडी दरवाज्याच्या कडी कोयंडा तुटलेला व दरवाज्याचे कुलुप तुटलेल्या स्थितीत घराचे खिडकीवर ठेवलेले आढळले. घराच्या दरवाज्या उघडा असल्याचे दिसल्याने घरात जावुन खात्री केली . यावेळी कौलारु घराच्या खोलीतील 2 पत्र्याची कपाटांचे दरवाजे उघडे होते व कपाटामधील सामान विस्कटलेले होते. तसेच कौलारु घराला लागुन असलेल्या स्लॅबच्या घराच्या खोलीतील दोन पत्र्याच्या कपाटांचे दरवाजे व 1 लाकडी कपाटाचा दरवाजा असे सर्व कपाटांचे दरवाजे उघडे होते. आतील सामान विस्कटलेले होते. यानंतर त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती मावशी सौ सुरेखा तानावडे यांना दिली. यावेळी त्यांनी कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू आहेत का ? याची खात्री करण्यास सांगितले. या वस्तू त्याठिकाणी न आढळल्याने याची चोरी झाल्याचे लक्षात आले. यामध्ये रु. ४० हजार रोख रक्कम, रु. २४ हजार किमतीची ८ ग्रॅम वजनाची सोन्याची जुनी वापरती चैन, रु. २४ हजार किमतीचे ८ ग्राम वजनाचे वापरते सोन्याचे मंगळसूत्र, रु. १८ किमतीच्या प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाच्या जुन्या वापरत्या सोन्याच्या दोन अंगठ्या, रु. १० हजार किमितेचे जुने वापरते २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट व वाटी असा एकूण १ लाख १६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे आढळून आले. याबाबतची फिर्याद सुरेखा तानवडे यांचा भाचा नंदन गोवेकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

पोलिसांना कळविल्याबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला. सौ सुरेखा तानावडे यांचे जूने कौलारू घर व स्लॅबचे घर एकमेकांना जोडून आहे. या चोरट्याने कौलारु घराच्या लाकडी दरवाज्याच्या कड़ी कोयंडा तोडला. या कौलारू घरातून स्लॅबच्या घरात प्रवेश करत यातील या किंमती वस्तू चोरून नेल्या.

या घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे वाकुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथक पाचारण करण्यात आले ते घराच्या परिसरातच घुटमळले. ठसेतज्ञानी ठसे घेतले आहेत.

या घटनेची फिर्याद नंदन गोवेकर यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे.या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(3),331(4),305 (a)प्रमाणे. गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे करत आहेत. अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!