-6.5 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

नेरुर-वाघोसेवाडी येथे आढळला दुर्मिळ पतंग

कुडाळ : विशेषतः दक्षिण भारत व श्रीलंकेमध्ये आढळून येणारा आणि दुर्मिळ असलेला “ॲटलास माॅथ” हा पतंग तालुक्यातील नेरूर-वाघोसेवाडी येथे आढळून आला आहे. निसर्ग अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांना हा भलामोठा पतंग आढळून आला. आशियाई जंगलांमध्ये आढळणारा हा एक मोठा सॅटर्निनिड पतंग आहे. या पतंगाचे पंख १२ इंच (सुमारे ३० सेंटीमीटर) एवढे मोठे असून, पंखांचा वरचा भाग लालसर तपकिरी रंगाचा असतो. या पतंगाचे आयुष्यमान खूप कमी असते. त्यामुळे हे पतंग दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री उडतात. साधारणपणे हे पतंग दक्षिण भारत आणि श्रीलंकेत प्रामुख्याने आढळतात. मात्र तो कुडाळ नेरूर गावात आढळून आल्यामुळे निसर्ग अभ्यासकांमध्ये आणि स्थानिक रहिवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैवविविधतेमध्ये आणखी एका दुर्मीळ प्रजातीची नोंद झाली आहे. हा पतंग या भागात कसा पोहोचला? याबाबत अधिक अभ्यास होण्याची शक्यता

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!