17.9 C
New York
Wednesday, October 15, 2025

Buy now

तोल गेल्याने सावंतवाडीत मोती तलावात युवक कोसळला

सुखरूप बाहेर काढण्यास यश

पोलीस व नागरिकांनी केले सहकार्य

सावंतवाडी : येथील मोती तलावाच्या काठावर बसलेला तरुण तोल जाऊन तलावात कोसळला. मात्र सुदैवाने त्या ठिकाणी पोलिस आणि नागरिकांनी धाव घेऊन त्याला सुखरूप बाहेर काढले. ही घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास येथील विश्रांती हॉटेल समोर घडली. सुभाष चव्हाण असे त्या युवकाचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो नशेत असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!