कणकवली : राज्य परिवहन महामंडळाचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रल्हाद नारायण धुले (४९) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मुळ अहिल्यानगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यातील शेकटे गावचे रहिवासी असलेल्या घुले यांनी काही महिन्यांपुर्वीच सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक म्हणून पदभार स्वीकारला होता. मात्र, काही दिवस काम केल्यानंतर ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर होते. शुक्रवारी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.