25.8 C
New York
Thursday, September 18, 2025

Buy now

झोळंबे भिडेवाडीत हत्तींचा धुमाकूळ

दोडामार्ग : तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या वन्यहत्तींनी आपला मोर्चा तळकट झोळंबे भागाकडे वळविला आहे. झोळंबे भिडेवाडी येथील सदाशिव महेश्वर भिडे यांच्या बागायतीत काल दि. ३जून रोजी हत्तींनी नासधुस केली आहे. वन्यहत्तींच्या वाढलेल्या वावरामुळे या भागात दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने ओंकार नाव ठेवलेला मोठा टस्कर आणि सोबत मादी आणि तिची दोन पिल्ले असे चार हत्ती कळपाने फिरत आहेत..या नुकसानीची झोळंबे सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ यांनी वनअधिकार्‍यासमवेत पाहणी केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!