-6.5 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

कवठी येथील उबाठा शाखाप्रमुखांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे यांनी केले स्वागत

मालवण : कवठी येथील उबाठा शाखाप्रमुख गोपाळ कवठकर यांसह सहकाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्य व नेतृत्वावर प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला.

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथील निलरत्न निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी जिप अध्यक्ष संजय पडते, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, दादा साईल यांसह मनिष वाडयेकर, राजू राणे, भास्कर खडपकर, शेखर मेस्त्री, भूषण राणे, आनंद परुळेकर अन्य पदाधिकारी तसेच प्रवेशकर्ते गोपाळ कवठकर यांसह प्रकाश राणे, गणपत शिरगांवकर, सौरभ मेस्त्री आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!