3.9 C
New York
Friday, March 20, 2026

Buy now

बांद्यात घरासमोरील बुलेट लंपास, अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद

बांदा : कट्टा कॉर्नर येथील रोहित श्रीकृष्ण काणेकर यांच्या घरासमोर लावलेली बुलेट काल मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पळवून नेली. यात अज्ञात तरूण चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. बांदा शहरात बुलेट चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रोहित काणेकर यांनी आपली बुलेट बांदा- कट्टा कॉर्नर येथील आपल्या घरासमोर पार्क केली होती. सकाळी उठल्यावर त्यांना आपली गाडी जागेवर दिसली नाही. त्यानंतर त्यांनी तातडीने बांदा पोलिसांत तक्रार दाखल केली. काणेकर यांच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण बुलेट चोरताना स्पष्टपणे दिसत आहे. जरी त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी, हा तरुण असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. बांदा शहर गोवा राज्याच्या सीमेवर असल्याने येथे रात्री पोलिसांची गस्त सुरू असते. अशा परिस्थितीतही बुलेट चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बांदा पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. लवकरच चोराला पकडून बुलेट परत मिळवण्यात यश येईल, अशी अपेक्षा रोहित काणेकर यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!