23.1 C
New York
Saturday, June 7, 2025

Buy now

कणकवली नंतर कुडाळ नाबरवाडीत घरफोडी | रोख रक्कमेसह दागिने लंपास

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

कुडाळ : तालुक्यातील नाबरवाडी येथील रहिवासी विनोद रुद्रे यांच्या घरात घरफोडी होऊन तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम, ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १ हजार रुपयांची सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन असा एकूण २ लाखांहून अधिक रकमेचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद रुद्रे हे ३ जून ला आपल्या मुलाजवळ मुंबईला गेले होते. त्यांच्या घरातील सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मुंबईत असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ आपल्या भावाला घरी पाठवून पाहणी करण्यास सांगितले. त्यांच्या भावाने घरी जाऊन पाहिले असता, घराच्या दर्शनी दरवाजाची कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे आणि घरातील कपाटे फोडून सामान अस्ताव्यस्त फेकल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच विनोद रुद्रे तात्काळ कुडाळला परतले आणि त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, घरातील कपाटांमधून १ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम, ४० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र आणि १ हजार रुपये किमतीची सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन चोरीला गेली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कुडाळ पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या घटनेनंतर ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक घरापासून सुमारे ४०० मीटरख अंतरावर नेरूर रस्त्यावर जाऊन घुटमळले, त्यामुळे पुढील तपास पोलिसांना सापडला नाही. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक आढाव, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि तपासी पोलीस अधिकारी भांड दयानंद चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!