कलमठ येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने महाराजांना मानवंदना
कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या “शिवराज्याभिषेक सोहळ्या” निमित्ताने कणकवली येथील शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कलमठ यांनी महाराजांना मानवंदना दिली.
शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कार्याचा गौरव करत त्यांना अभिवादन केले. यावेळी उत्सव समितीचे पदाधिकारी सुशांत राऊळ, पी.व्ही. कांबळे सर, अनुप वारंग, धीरज मेस्त्री,नितीन पेडणेकर, वसंत मेस्त्री,भाई परब उपस्थित होते .
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य हे सदैव प्रेरणादायी राहतील,छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनचरित्रातून आणि विचारांमधून अनेक प्रेरणादायी गोष्टी शिकवल्या आहेत आणि ते आम्ही नेहमीच आत्मसात करू
असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.