-0.9 C
New York
Monday, February 23, 2026

Buy now

बांदा भाजपा तर्फे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा

बांदा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपा बांदा शहर तर्फे आळवाडी येथील अटल बिहारी वाजपेयी उद्यानात आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, क्रीडा संयोजक गुरुदत्त कल्याणकर, भाजपा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, पर्यावरण दीन संयोजक साईश कुमार केसरकर, बांदा महिला शहर अध्यक्ष सौ. स्मिता पेडणेकर, शक्ती केंद्र प्रमुख मनोज कल्याणकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, श्रेया केसरकर, रेश्मा सावंत, बूथ अध्यक्ष राकेश केसरकर सिद्धेश महाजन आदी उपस्थित होते.

सरपंच श्रीमती नाईक म्हणाल्या की, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन आपल्या परिसरात मोकळ्या जागेत झाडे लावावीत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!