22.5 C
New York
Friday, June 6, 2025

Buy now

देवगडात ३ लाखांचा अवैध खत साठा जप्त, विक्रेत्यावर गुन्हा दाखल

सिंधुदुर्गनगरी : देवगड तालुक्यातील मौजे कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ३ लाख ३१ हजार रुपये किमतीचा अनधिकृत खत साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कृषी सेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कातवणेश्वर येथील सुखकर्ता कृषीसेवा केंद्र या निविष्ठा केंद्राचे नजीकच्या शेतमांगरात कृषीसेवा केंद्राचे मालक राहुल जोईल हे अवैधरित्या रासायनिक व सेंद्रीय खताचा साठा व विक्री करत असलेबाबत दिसुन आले. संबधितांना विचारणा केली असता त्यांच्या जवळ खत विक्रीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे देवगड पोलीस ठाणे येथुन पोलीस मदत घेवुन शेतमांगराची तपासणी केली असता त्यामध्ये ३ लाख ३१ हजार २०० रूपये किंमतीचा अवैध खत साठा आढळुन आला. ही कारवाई अत्यावश्यक वस्तु कायदा १९५५ आणि खत नियंत्रण आदेश १९८५ मधील कायद्यांनुसार करण्यात आली आहे. या प्रकरणी, संबंधित अनधिकृत खत विक्रेता याच्या विरोधात संबंधित कायद्यानुसार देवगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभाग आणि पोलीस प्रशासन या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. कृषी विभागाच्या धडक कारवाईमुळे खतांच्या अवैध विक्रीला आळा बसण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक दुकानातूनच खते खरेदी करावीत आणि खरेदी करताना पक्के बिल घ्यावे तसेच कोणत्याही प्रकारच्या अवैध विक्रीबाबत माहिती मिळाल्यास कृषी विभागाला कळवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!