9.3 C
New York
Friday, March 20, 2026

Buy now

वेंगुर्लेत पिंपळाचे झाड कोसळल्याने दुचाकीचे नुकसान, सुदैवाने दोघे बचावले

वेंगुर्ले : वेंगुर्ले-सावंतवाडी मार्गावरील वेंगुर्ले शहरातील रामघाटानजीक मुख्य रस्त्यावर आज रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास अचानक एक भलेमोठे पिंपळाचे झाड कोसळले. या घटनेत रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीवर हे झाड पडल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, गाडीवरील तुळस येथील दोघे तरुण बालंबाल बचावले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान या घटनेमुळे वेंगुर्ले-सावंतवाडी मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी, झाड कोसळल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील झाडांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनाने धोकादायक झाडांची पाहणी करून ती काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!