22.5 C
New York
Friday, June 6, 2025

Buy now

जिल्ह्यात ७,८२६ दिव्यांग बांधवांची झाली नोंदणी

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची माहिती

ओरोस : जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभदिव्यांग लाभार्थ्यांना व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग बांधवांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यानुसार जिल्ह्यात ७,८२६ दिव्यांग बांधव असल्याचे समोर आले आहे. यात ८६३ अंध, ३९३ कर्णबधीर, ४८२ मूकबधीर, ३,६९९ अस्थिव्यंग, २,००७ मतिमंद व ३८२ इतर दिव्यांग बांधवांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत देण्यात आली.

दिव्यांग बांधवांना जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावरील उपकर निधीमधून विविध योजनांमधून स्वयंरोजगारासाठी किंवा इतर कारणांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. अशा प्रकारे सहाय्य करताना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीस्तरावर दिव्यांग बांधवांची निश्चित आकडेवारी उपलब्ध नव्हती. अलीकडेच जिल्हा परिषदेमार्फत गावागावात असलेल्या दिव्यांग बांधवांची माहिती संकलित करणेबाबत अभियान राबविले गेले. आता ही माहिती उपलब्ध झाली असून, जिल्ह्यात आठ तालुक्यात मिळून एकूण ७,८२६ दिव्यांग बांधव असून, यात ८६३ अंध, ३९३ कर्णबधीर, ४८२ मूकबधीर, ३,६९९ अस्थिव्यंग, २,००७ मतिमंद व ३८२ इतर दिव्यांग बांधव आढळून आले आहेत.

दिव्यांग बांधवांची माहिती संकलित करताना त्यांनी आतापर्यंत घेतलेला शासकीय योजनांचा लाभ, असलेल्या अत्यावश्यक गरजा याबाबतची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना कोणत्या योजनांची प्राधान्याने गरज आहे हेसुद्धा निश्चित करणे सुलभहोणार आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, समाजकल्याण अधिकारी बाळकृष्ण परब यांनी दिली आहे.

नोंद झालेल्या दिव्यांग व्यक्तींची संख्या –
१) ८६३ अंध
२) ३९३ कर्णबधीर
३) ४८२ मूकबधीर
४) ३,६९९ अस्थिव्यंग
५) २,००७ मतिमंद
६) ३८२ इतर

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!