20.8 C
New York
Thursday, June 5, 2025

Buy now

“त्या” ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा ; ठाकरे शिवसेनेची मागणी

सावंतवाडी पोलीस निरीक्षकांची घेतली भेट, कारवाईचे आश्वासन

सावंतवाडी : मळगाव घाटात १५ दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे गटारांमधील दगड, गोटे आणि माती रस्त्यावर आल्याने दुचाकी घसरून निवृत्त आरोग्य अधिकारी मॅथ्यू यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. या अपघाताला सार्वजनिक बांधकाम खाते आणि गॅस पाईपलाईन टाकणारा ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

याबाबत ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेतली.

यावेळी श्री. राऊळ म्हणाले, गॅस लाईन पाईप टाकताना सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेली परवानगी चुकीची होती. नुकतेच गटारांचे बांधकाम केलेले असताना, तेच पुन्हा फोडून त्यातून गॅस लाईन टाकण्यात आली. यामुळे गटारे पूर्णपणे बंद झाली. परिणामी, अवकाळी पावसामुळे गटारांमधील सर्व पाणी रस्त्यावर आले आणि या ठिकाणी माती व दगड पसरले, ज्यामुळे लहान-मोठे अपघात झाले. याच अपघातांपैकी एका अपघातात निवृत्त अधिकारी मॅथ्यू यांची दुचाकी घसरली आणि त्यांचे दुर्दैवाने निधन झाले. या अपघाताला सार्वजनिक बांधकाम खाते आणि गॅस पाईपलाईन टाकणारा ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी आम्ही याबाबत निश्चितच चौकशी करून संबंधित यंत्रणेकडून माहिती घेऊ आणि योग्य ती कारवाई करू,” असे आश्वासन श्री. चव्हाण यांनी दिले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!