गणपती साना येथील गडनदी पात्रात दाखवले प्रात्यक्षिक
कणकवली : पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर कुठे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली तर काय करावे. याबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी एनडीआरएफ ची टीम सोमवारी कणकवली तहसीलदार कार्यालय येथे दाखल झाली होती. कणकवली तालुका प्रशासनाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत कणकवली येथील गणपती साना या ठिकाणी एनडीआरएफ च्या पथकाने प्रॅक्टिकल करून प्रशिक्षण दिले. यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यावर प्रथम पर्याय म्हणून काय केले पाहिजे. कोणत्या वस्तूंचा वापर करावा, याबाबत माहिती देण्यात आली. तसेच आपल्या प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या बोटिंचा वापर कसा करावा. त्याची जोडणी कशी केली पाहिजे. बोट जोडत असताना तसेच पाण्यात नेऊन सुरू करत असताना काय काळजी घेतली पाहिजे. याबाबतची माहिती एनडीआरएफचे इन्स्पेक्टर नितीन सोकाशे यांनी दिली.
तसेच पाण्याच्या बॉटल्स, माडावरील नारळ, थर्माकोल व प्लास्टिक गोनी पासून जॅकेट करून पूरजन्य परिस्थितीत बचाव कसा करायचा याची माहिती दिली. गणपती साना येथील गडनदी पात्रात एनडीआरएफ च्या पथकाने बोट जोडून प्रात्यक्षिक देखील दाखवले.
यावेळी प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, नायब तहसीलदार मंगेश यादव, गंगाराम कोकरे, मंडल अधिकारी एम.एम.पाटील, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, श्री. कवटकर, एनडीआरएफ टीमचे लिडर नितीन सोकासे, एस. आर. वावलेकर, एस.बी.माळवे, व्ही. बी. चव्हाण, एम. ए. गायकवाड, प्रथमेश गुरसाळे, आर.आर. मेस्त्री, राजेश शिरवलकर, खारेपाटणचे माजी सरपंच रमाकांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, श्री. मानवर यांच्यासह महसूल, पोलीस, पंचायत समिती, नगरपंचायतीचे कर्मचारी ,पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.