14.6 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

नैसर्गिक शेतीमालाला हमीभावाची गरज – ब्रिगे. सुधीर सावंत

कणकवली : किर्लोस कृषी विज्ञान केंद्रा द्वारे कृषी सखीना पाच दिवस कालावधीचे नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण घेण्यात आले. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियाना अंतर्गत आत्मा मार्फत सिंधुदुर्ग मध्ये ५२ कृषी सखींची नेमणूक करण्यात आली आहे. या अभियाना अंतर्गत गावामध्ये नैसर्गिक शेतीचे समूह स्थापन करण्यात आले आहेत. समूहातील शेतकऱ्यांशी समन्वय साधने व नैसर्गिक शेतीचा प्रचार प्रसार करणे साठी कृषी सखींची नेमणूक करण्यात आली आहे.

किर्लोस कृषी विज्ञान केंद्राची नैसर्गिक शेतीसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्था म्हणून निवड झाली आहे. केंद्रा मार्फत कृषी सखीना पाच दिवसाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा शुभारंभ केंद्राचे संस्थापक अध्यक्ष व नैसर्गिक शेती चळवळीचे प्रणेते माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी सुधीर सावंत यांनी कृषी सखीना मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेतीतून तयार झालेल्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे व त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असे ते म्हणाले. नैसर्गिक शेतीतून आरोग्यदायी अन्न निर्मिती करण्यास मदत होते. याद्वारे जमिनीची सुपीकता वाढते व भरघोस उत्पन्न घेता येते. ही उत्पादन वाढीसाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण महत्त्वाचे असते.

जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी नैसर्गिक शेती हा एक उत्तम पर्याय आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जैविक निविष्ठा आपल्याच शेतावर तयार करून वापराव्यात व शेतीत होणाऱ्या उत्पादन खर्चात बचत करावी असे आवाहन सुधीर सावंत यांनी मार्गदर्शन करताना कृषी सखीना केले.

सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रदीप सावंत यांनी उपस्थित कृषी सखीना मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेतीची चळवळ सुधीर सावंत यांनी उभी केली. केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या नैसर्गिक शेती अभियाना मध्ये सुधीर सावंत व कृषी विज्ञान केंद्राचा सिंहाचा वाटा आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका वरुणी सावंत व आत्माच्या प्रकल्प संचालक प्रगती तावरे व मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव उपस्थित होते. नाबार्डच्या जिल्हा व्यवस्थापक दिपाली माळी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. नाबार्डचे माजी अधिकारी फाटक उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये एकूण ४५ कृषी सखीनी सहभाग घेतला. प्रशिक्षणाचे आयोजन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

नैसर्गिक शेतीचे फार्मर मास्टर ट्रेनर सुरेश मापारी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे मुख्य समन्वयक शास्त्रज्ञ डॉ. विलास सावंत होते. शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, विकास धामापूरकर, सुयश राणे डॉ. केशव देसाई, विवेक सावंत भोसले, सिद्धेश गावकर यांनी कृषी सखीना व्याख्यान व प्रात्यक्षिका द्वारे मार्गदर्शन केले. कार्यक्रम नियोजनासाठी केंद्राचे अधिकारी मंगेश पालव, नरेंद्र सावंत, सिद्धेश गावकर , अरुण पालव, जिलू घाडीगावकर, मिलिंद घाडीगावकर यांनी यांनी सहकार्य केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!