कणकवली : वैभव नाईक यांनी अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची पाहणी कधी करणार अशी विचारणा केल्यानंतर खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात येऊन गेले. पण खासदार नारायण राणे यांनी केवळ शासकीय बैठकीचा सोपस्कार पूर्ण केल्याची टीका शिवसेना उबाठा चे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. नॅशनल हायवेची दुर्दशा झाली असून खासदारांच्या बैठकीला हायवे अधिकाऱ्यांनी दांडी मारली. राणेंच्या गावात जाणाऱ्या वरवडे नदीवरील पूल पडला. त्यामुळे 4 किलोमीटर चा वळसा जनतेला पडत आहे. त्याबद्दल ही राणेंनी या बैठकीत वाच्यता केली नाही. 2024 साली झालेल्या नुकसानीची अद्याप भरपाई जनतेला मिळाली नाही. मात्र त्याबद्दलही राणे बोलले नाहीत. आताही झालेल्या अवकाळी पावसाने नुकसानीचे पंचनामे होतील पण त्याची भरपाई देण्यासाठी शासनाकडे निधीच उपलब्ध नाही. लाडक्या बहिणींच्या योजनेला निधी दिल्यामुळे जनतेला नुकसानभरपाई देण्यास शासन हतबल आहे. खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात एक दिवस आणि रत्नागिरीत एक दिवस दौरा करून लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्याचे दाखवले. प्रत्यक्षात जनतेच्या झालेल्या नुकसानीची पाहणीही राणेंनी केली नाही. यावरून राणे प्रायव्हेट लिमिटेड चे डायरेक्टर हे निवडणुकी पुरते जनतेच्या दारात येतात. मात्र निवडून आल्यानंतर राणे जनतेकडे दुर्लक्ष करतात हे पून्हा सिद्ध झाल्याची टीका माजी आमदार उपरकर यांनी केली.