नवी मुंबई – केंद्र शासनाच्या ‘अमृत महा आवास अभियान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्यामध्ये दुसरा आला असून देवगड तालुका ही तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये दुसरा आला आहे. या यशामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. अमृत महा आवास अभियान २०२२ -२३’ या पुरस्काराचे वितरण दिनांक ३ जून रोजी बालेवाडी येथे गिरिराज सिंह केंद्रीय मंत्री ग्राम विकास विभाग व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांचे हस्ते होणार आहे.
विभागीय स्तरावर कोकण विभागाने प्रथम क्रमांक पटकावला असून, जिल्हास्तरावर अहिल्यानगर जिल्ह्याने प्रथम तर सिंधुदुर्ग जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर तृतीय क्रमांक सातारा व गोंदिया जिल्ह्याला मिळाला आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला प्रथम क्रमांक मिळाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तर तृतीय क्रमांक सातारा जिल्ह्यातील जावळीला मिळाला आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने अमृत महा आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी देशभरातील राज्यांचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांनी या अभियानात उल्लेखनीय प्रगती केली असून, ‘आवास मित्र’ यांच्याकडून उत्कृष्ट कार्य पार पाडण्यात आले आहे