16.5 C
New York
Monday, June 2, 2025

Buy now

माणगाव हायस्कूल संस्थेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलची बाजी

९ पैकी ७ जांगावर विजय मिळवत सत्ताधारी सगुण धुरी यांच्या पॅनलने विरोधकांचा केला सुफडा साफ

चंद्रशेखर जोशी यांच्या शिक्षण अग्रणी पॅनलला २ जांगावर विजय

चंद्रशेखर जोशी यांच्यासह योगेश फणसळकर विजयी

बाळा आगलावे यांच्या परिवर्तन पॅनलचा धुव्वा

विनोद चव्हाण, पांडू सावंत, बाळा आगलावे, जोसेफ डाॅन्टस, विजय पालकर, देवेंद्र धुरी, विजय भिसे, विश्वनाथ परूळेकर, सुरबा सावंत या मातबरांचा धक्कादायक पराभव

कुडाळ : माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक विद्यमान अध्यक्ष आणि माजी बांधकाम सभापती असलेल्या सगुण धुरी यांच्या श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलने विरोधी दोन्ही पॅनलना थेट लढतीत धुळ चारत ९ पैकी ७ जांगावर विजय मिळत निर्विवाद सत्ता हाती घेतली आहे. तर
विद्यमान संचालक चंद्रशेखर जोशी यांच्या पॅनलने दोन जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, वासुदेवानंद सरस्वती परिवर्तन पॅनलचे पॅनल प्रमुख तसेच संस्थेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच बाळा आगलावे, विजय पालकर, जोसेफ डॉटन्स, विनोद चव्हाण, पांडू सावंत, एकनाथ केसरकर, अरूण म्हाडगुत, कमलाकर धुरी, कमला भोसले या ९ ही उमेदवारांचा धक्कादायक पराभव झाला आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती परिवर्तन पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडला आहे. या तिरंगी लढती बरोबर दोन अपक्षांनी शड्डू ठोकला होता. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच रंगतदार निवडणूकीतीत विद्यमान अध्यक्ष सगुण धुरी यांनी सर्वात जास्त मते घेत विरोधकांना आसमान दाखवले आहे. या विजयानंतर सत्ताधारी पॅनलच्या समर्थकाने रात्री उशिरा एकच जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला.
माणगाव हायस्कूलच्या आतापर्यंतच्या इतिहासाच्या काळात माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव या संस्थेची गेली कित्येक वर्षे बिनविरोध निवड झाली होती. मात्र पी. टी. आर मिळण्याच्या दृष्टीने धर्मादाय आयुक्त यांनी थेट निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर धर्मादायक आयुक्ताच्या आदेशानुसार ही निवडणूक संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच काल झाली. काल सकाळी पासून सुरु झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण ७८३ मतदारांपैकी ३७२ मतदाराने मतदान केले यामध्ये १२ मते ही अवैध ठरली. संध्याकाळी सहा वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच विद्यमान
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तथा पॅनल प्रमुख सगुण धुरी यांच्यासह पॅनलने आघाडी घेतली होती. श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनलचे आठ उमेदवार सातव्या आणी आठव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. तर शिक्षण अग्रणी पॅनलचे विद्यमान संचालक चंद्रशेखर शिवराम जोशी यांनी सुरुवातीपासून जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली होती. तर तिसरे पॅनलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल उर्फ बाळा हरी आगलावे यांच्यासह त्यांचे नववी उमेदवार सुरुवातीपासूनच मोठ्या पिछाडीवर पडले होते. नवव्या आणि दहावी फेरी अखेर चंद्रशेखर जोशी यांच्या शिक्षण आग्रणी पॅनलचे योगेश फणसळकर यांनी मोठी मुसंडी मारत निर्णायक आघाडी घेतली. अखेर ही आघाडी शेवटच्या बाराव्यरा फेरीपर्यंत ठेवत ते अखेर विजयी झाले . मात्र नवव्या उमेदवारासाठी बाळा जोशी, मेघशाम पावसकर, बाली नानचे आणि मनोहर साटम या सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारामध्ये चुरस निर्माण झाली होती. यात बाळी जोशी आणि बाली नानचे विजयी झाले. तर मेघश्याम पावसकर यांनी बाजी मारत एका मताने थरारक विजय मिळवला. तर मनोहर साटम यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला. सत्ताधारी पॅनलला बहुतांशी प्रमाणात पॅनल टू पॅनल मतदान झालेले पहायला मिळाले. त्यांचे सात उमेदवार विजयी झाले तर मनोहर साटम आणि दीपक सावंत हे सत्ताधारी पॅनलचे दोन उमेदवार पराभूत झाले.तर चंद्रशेखर जोशी यांच्या विश्वनाथ परुळेकर, विजय भिसे, देवेंद्र उर्फ कुमार धुरी या उमेदवाराने विरोधकांना काटे की टक्कर दिली. मात्र, ते निर्णायक विजयापासून वंचित राहिले. तर बाळा आगलावे यांच्या श्री वासुदेवानंद सरस्वती परिवर्तन पॅनलच्या नऊही उमेदवारांचा धुवा उडाला. यापेक्षा अपक्ष उमेदवार विजय केसरकर आणि नारायण कदम यांनी घेतलेली मतामे लक्षणीय वाटत होती.
पाच वाजता मतदान संपले तेव्हा ७८३ पैकी ३७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणुकीत जोरदार चुरस पहायला मिळाली होती. विद्यमान अध्यक्ष तथा श्री स्वामी समर्थ शैक्षणिक विकास पॅनल प्रमुख सगुण धुरी, शिक्षण अग्रणी पॅनल प्रमुख चंद्रशेखर जोशी, श्री वासुदेवानंद सरस्वती पॅनल प्रमुख बाळा आगलावे यासह एकूण २९ उमेदवारांनी हसत खेळत निवडणूकीस सामोरे जात एकीचे दर्शन घडवून आणले. माणगाव हायस्कूल मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात सहा वाजता सुरू झालेले मतमोजणी रात्री उशिरा साडेबारा वाजेपर्यंत संपली. शेवटचा निकाल रात्री साडेबारा वाजता येताच विजय उमेदवारानी आणि त्याच्या समर्थकानी जोरदार जल्लोष केला.
आपण या विजयाने भराहून जाणार नसून माणगाव हायस्कूल समोर आणि संस्थे समोर अनेक आव्हाने आहेत. पटसंखेचा प्रश्न समोर आहे. याशिवाय तुकड्यांचा प्रश्न फार मोठा गंभीर असून अनेक शिक्षक अतिरिक्त झाले असून अतिरिक्त होत आहेत. या शिक्षकांना पुन्हा आणण्याचं आव्हान आपल्यासमोर असणार आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन यावर मार्ग काढणार आहोत.जे विरोधात लढले आणि सोबत होते या सगळ्यांना सोबत घेऊन संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी झटत राहणार असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, मतदारांनी आणि सर्वांनी दिलेले साथ यामुळे आपला विजय झाला. एवढे वर्ष चांगले काम केले. त्याचीच पोच पावती मतदारांनी दिली. असा दावा विद्यमान पॅनलचे अध्यक्ष सगुण धुरी यानी केला आहे. तर या पॅनलचे विजयी उमेदवार चंद्रशेखर जोशी यांनी मतदारांना धन्यवाद देत जे सात उमेदवार पराभूत झाले. ते का पराभूत झाले? याच्यावर आत्मचिंतन करून पुन्हा एकदा जोमाने काम करणार असल्याचे सांगत माणगाव हायस्कूलच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटत राहणार असल्याचे सांगत ज्या मतदारांनी आपल्या पॅनलला मतदान केले त्यांना धन्यवाद देत असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. तर पराभूत झालेल्या श्री वासुदेवानंद सरस्वती परिवर्तन पॅनलचे प्रमुख बाळा आगलावे, विजय पालकर, विनोद चव्हाण, पांडू सावंत,जोसेफ डाॅन्टस यांनी पराभव मान्य करत मतदाराने आपल्यावर जो विश्वास टाकला तो निश्चितच सार्थकी ठरवू. या शाळेचे आम्ही माजी विद्यार्थी आहोत. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो होतो. पण मतदारानी दिलेल्या कौल आम्हाला मान्य आहे. शाळेतील भविष्यातील जडण सुधारण्यासाठी आमचेही प्रयत्न असतील. आणि जे विजयी झालेत त्यांना शुभेच्छा देत भविष्यात शाळेसाठी काहीतरी करण्याचा आमचाही प्रयत्न असेल, असाही दावा करत मतदारांना धन्यवाद दिलेत. तर मतदाराने दिलेल्या कौल आम्ही स्वीकारत जोमाने काम करत राहण्याचा दावा त्यांनी केला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!