-6.5 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

सावंतवाडीत भर रस्त्यात बस पडली बंद ; मोठी वाहतूक कोंडी

सावंतवाडी : शिवाजी चौक, सावंतवाडी येथे वेंगुर्ला एस.टी. स्टॅन्डसमोर शनिवारी सायंकाळी एक एस.टी. बस अचानक बंद पडल्याने मुख्य रस्त्यावर अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली. बस रस्त्याच्या मध्यभागी बंद पडल्याने दोन्ही बाजूंच्या वाहनांची मोठी कोंडी झाली होती.

शिवाजी चौकातच तांत्रिक बिघाडामुळे ती एसटी बंद पडली. एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रयत्न सुरू केले, मात्र सुमारे अर्ध्या तासानंतरच बस बाजूला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

या घटनेमुळे अनेक शाळकरी विद्यार्थी, कामावर जाणारे नागरिक आणि पर्यटक अडकल्याने नाराजी व्यक्त होत होती. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारची वाहतूक अडचण वारंवार होणे ही चिंतेची बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने अशा आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!