सिंधुदुर्गनगरी : उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व तालुक्यामध्ये रिक्त असलेली मानसेवी सदस्य पदांची भरती करण्यासाठी स्वयंसवेक नोंदणी कार्यक्रम २ ते १२ जून रोजी सकाळी १० वाजता उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी, तसेच जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय व प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्गनगरी (ओरोस) सिडको भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील पुरुष, महिला प्रवर्गानी नवीन सदस्य नोंदणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी केले आहे.
उमेदवारास नोंदणीच्या वेळी त्यांना स्वखर्चाने यावे लागेल, तसेच नोंदणीच्या वेळी कोणत्याही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क करावा.