19.5 C
New York
Sunday, August 3, 2025

Buy now

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर

कणकवली : विवाहितेला वारंवार फोन करून अश्लील बोलत रात्रीच्यावेळी तिच्या खोलीवर जात अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी सिद्धेश बाळू खरात, प्रमोद प्रकाश कोकरे यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच.बी. गायकवाड यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

एका गावातील विवाहित महिलेचा वारंवार पाठलाग करून व तिचा मोबाइल नंबर मिळवून तिला वेळी-अवेळी फोन केले. तसेच रात्रीच्यावेळी ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत राहत्या घरी जात अश्लील वर्तन केल्याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवर भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५, ७८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत संशयितांच्यावतीने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता सुनावणीअंती प्रत्येकी ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर करताना पुराव्यात ढवळाढवळ करू नये, तक्रारदार महिलेशी संपर्क साधू नये, आदी अटी घालण्यात आल्या आहेत. संशयितांच्यातीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!