16.5 C
New York
Monday, June 2, 2025

Buy now

जिल्ह्यात तासनतास वीज पुरवठा खंडित राहणार नाही यासाठी दक्षता घ्या

पालकमंत्र्यांच्या सूचना; कुडाळातील वीज कंपनीच्या नियंत्रण कक्षाला दिली भेट..

कुडाळ : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कुडाळ येथील वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयातील नियंत्रण कक्षाला भेट दिली. यावेळी तेथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षाच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या, तसेच विद्युत पुरवठा जास्त काळ खंडित ठेवू नये, असे सक्त निर्देशही दिले. नागरिकांच्या विद्युत पुरवठ्यासंबंधीच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राणे यांच्या सूचनेनुसार हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना काळोखात राहावे लागले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना तात्काळ नियंत्रण कक्ष स्थापन करून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. आजच्या भेटीदरम्यान, पालकमंत्री राणे यांनी नियंत्रण कक्षात दाखल झालेल्या तक्रारींची माहिती घेतली. तक्रारींचे किती तासांत निराकरण झाले, याबाबत त्यांनी विचारणा केली आणि तक्रारींच्या पुस्तकाची पडताळणी केली. तसेच, ऑनलाईन प्राप्त झालेल्या तक्रारींचीही त्यांनी माहिती घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता वनमोरे यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, नियंत्रण कक्षाचे कामकाज आणखी सुधारले पाहिजे. आलेली तक्रार संबंधितांपर्यंत तात्काळ पोहोचणे अपेक्षित आहे आणि यामध्ये कोणताही विलंब होऊ नये. तसेच, तासनतास विद्युत पुरवठा खंडित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!