13.6 C
New York
Monday, October 13, 2025

Buy now

माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत व संजना सावंत यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप

भिरवंडे व गांधीनगर गावातील दीडशे शेतकऱ्यांनी घेतला लाभ

कणकवली : शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे भात पीकाचे उत्पन्न मिळावे यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व संजना सावंत यांच्या संकल्पनेतून भिरवंडे व गांधीनगर परिसरातील शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

लवकरच शेतकऱ्यांना खत वाटप करणार असल्याचे देखील सौ. सावंत यांनी सांगितले.

यावेळी बोलताना रमेश सावंत म्हणाले, संदेश सावंत व संजना सावंत हे मागील काही वर्षे शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करत आहेत. त्यांची शेतकऱ्यांप्रति असलेली आस्था ही चांगली असून गावातील विकास कामे ही खा. नारायण राणे, पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून पूर्णत्वास नेलेली आहे. गावच्या विकासासाठी नेहेमीच कटिबद्ध असलेल्या व्यक्तींसमवेत शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पाठीशी राहील असा विश्वास श्री. सावंत यांनी दिला.

यावेळी सांगवे माजी सरपंच मयुरी मुंज, निवृत्त पोलीस अधिकारी रमेश सावंत, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, भिरवंडे सोसायटी माजी चेअरमन संतोष सावंत, शक्ती केंद्र प्रमुख श्रीकांत सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य विनय सावंत, प्रशांत कांबळे, राजू जाधव, मिलिंद बोभाटे, भिरवंडे माजी सरपंच बाबन लोबो, राजेश सावंत भिरवंडे – गांधीनगर गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!