22 C
New York
Tuesday, August 5, 2025

Buy now

आपत्तीकाळासाठी वॉकीटॉकीचे वितरण

जिल्हयातील प्रमुख अधिकाऱ्यांना ‘वायरलेस’ हाताळण्याचे प्रशिक्षण

समन्वय साधून आपत्तीकाळात लोकांना मदत करा – जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील प्रमुख बरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर, चक्रीवादळ अशा आपत्ती काळात संवाद साधण्यासाठी वॉकीटॉकी किंवा वायरलेस कम्युनिकेशन हे कसे उपयुक्त ठरते, याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली

बुधवारी पार पडले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी आपत्ती काळात बॉकिटॉकी व वायरलेसचा वापर करून समन्वय साधावा व लोकांना मदत करावी, अशा सूचना केल्या. यावेळी त्यांनी वायरलेस व वॉकीटॉकी सेटचे वाटपही केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विभाग प्रमुखांना वायरलेस कम्युनिकेशन व वॉकीटॉकी हाताळण्याचे प्रशिक्षण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत देण्यात आले.

यावेळी प्रमुख प्रशिक्षक म्हणून कोल्हापूरचे नितीन ऐनापुरे उपस्थित

होते. तसेच जिल्हाधिकारी अनिल पाटील, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत उपस्थित होते. अधिकाऱ्यांना मार्गदर्शन वॉकी टॉकी हाताळण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. पूर चक्रीवादळ अशा आपत्ती काळात संवाद साधण्यासाठी वॉकीटॉकी किंवा वायरलेस कम्युनिकेशन हे कसे उपयुक्त ठरते, याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वॉकीटॉकीचे वाटप करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!