7.2 C
New York
Thursday, March 5, 2026

Buy now

कणकवलीत आठवडा बाजाराला पावसामुळे मोठा फटका

कणकवली ( मयुर ठाकूर ) : मंगळवारी सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. याचा फटका कणकवली आठवडा बाजाराला बसला आहे. कणकवलीचा आठवडे बाजार नेहमीच गजबजलेला असतो. मात्र बाहेर गावातून येणाऱ्या ग्राहकांना अतिवृष्टीमुळे बाजारात येणं शक्य होत नसल्याने भर मंगळवारी आठवडा बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला. यामुळे भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसेच अन्य विक्रेते यांचं मात्र नुकसान झालेलं पहायला मिळालं.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!