28.1 C
New York
Thursday, July 31, 2025

Buy now

वानहुआ इंटरनॅशनल ने दिलेली रुग्णवाहिका गरजूंसाठी खरोखर उपयुक्त ठरेल – फ्रेड व्हियु

वानहुआ विकास सुरु ठेवेल आणि सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमांद्वारे आम्ही एकत्रितपणे देशालाही पाठिंबा देऊ

कणकवली : वानहुआ इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड सर्वसामान्यांच्या
सुदृढ आरोग्यासाठी ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आणि जनसामान्यांची सेवा हाच धर्म’ या तत्वांवर चालणारे असून नेहमीच सर्वसामान्यांसाठी काम करीत राहील, वानहुआ इंटरनॅशनल ने दिलेली रुग्णवाहिका गरजूंसाठी खरोखर उपयुक्त ठरेल.असे प्रतिपादन वानहुआ इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड चे सेल्स मॅनेजर फ्रेड व्हियु यांनी शिरवल येथे केले. ते शिरवल ग्रामपंचायत येथे रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते रुग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर वानहुआ इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड चे डायरेक्टर ब्राएन यांग, फायनान्स हेड शुव्हि कुई, डायरेक्टर शाईन मॅथ्यू, सिनियर सप्लायचेंज स्पेशालिस्ट अविनाश शिरवलकर, सुप्रिया बर्वे, डॉ. दिलीप घाडी, कृष्णा कुडतरकर, आत्माराम शिरवलकर, सरपंच गौरी वंजारे, उपसरपंच प्रविण तांबे, पोलिस पाटील सुशिल तांबे, माजी सरपंच मनोज राणे, महेश शिरवलकर, ग्रामसेविका श्रुती येडके, तलाठी वर्षा कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य रविकांत तांबे, सुचित गुरव, प्रिती सावंत, चैताली पांचाळ, आरोग्य सेवक डि. बी. सुर्वे, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना फ्रेड व्हियु म्हणाले की, आम्ही वानहुआ इंटरनॅशनलच्या सीएसआर प्रकल्पासह शिरवल येथे आहोत.मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की वानहुआने या गावाला एक रुग्णवाहिका दिली आहे. जी येथील गरजूंसाठी खरोखर उपयुक्त ठरेल. याआधी आम्हाला गेल्या वर्षी जवळच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरवल या शाळेतील सुविधा सुधारून या गावाला मदत करण्याची संधी मिळाली होती. मी हे अधोरेखित करु इच्छितो की वानहुआ विकास सुरु ठेवेल आणि अशा सामाजिक जबाबदारीच्या उपक्रमांद्वारे आम्ही एकत्रितपणे या देशालाही पाठिंबा देऊ.

यावेळी कृष्णा कुडतरकर बोलताना म्हणाले की,वानहुआ इंटरनॅशनल संस्थेने आपल्या सिएसआर फंडातून शिरवल शाळेच्या शैक्षणिक सुविधांसाठी साडेचार लाखांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला.तसेच गावासाठी अत्याधुनिक सोयी सुविधा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.त्यांची ही सामाजिक बांधिलकी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.त्यांचे हे उपक्रम आणि सामाजिक कार्य सर्वांसाठी आदर्शवत आहे.त्यांच्या या भरीव कामामुळे आमच्या शिरवल ग्रामस्थांच्या मनात आदर व सन्मान आहे.शिरवल गावचे सुपुत्र आणि वानहुआ इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड चे सिनियर सप्लायचेंज स्पेशालिस्ट अविनाश शिरवलकर यांच्या प्रयत्नातून आज शिरवल गावाला रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे.त्यामुळे हि रुग्णवाहिका रुग्णांना जीवनदायी ठरणार आहे.त्यामुळे अविनाश शिरवलकर आणि वानहुआ इंटरनॅशनलचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.त्यांच्या या सामाजिक उपक्रमांना आणि वानहुआ इंटरनॅशनल ला आम्ही शुभेच्छा देतो.

यावेळी उपसरपंच प्रविण तांबे, सुप्रिया बर्वे,तुळशीदास कुडतरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वानहुआ इंटरनॅशनलच प्रायव्हेट लिमिटेड च्या टिमचा शिरवल ग्रामपंचायत च्या वतीने शाल ,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रुती येडके यांनी केले.तर आभार प्रविण तांबे यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!