16.5 C
New York
Monday, June 2, 2025

Buy now

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने एसटीएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ISRO सफर

कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ मधील ४ थी, ६ वी व ७ वी या इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादीतील प्रथम पाच अशा पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात ११ जून ते १४ जून २०२५ या कालावधीत विमानाने शैक्षणिक सहल ISRO भेटीसाठी नेण्यात येणार आहे.

या सहली दरम्यान १) भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बेंगळुरू २) विश्वेश्वरय्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान संग्रहालय ३) सेंट फिलोमेना चर्च ४) मैसूर प्राणीसंग्रहालय (झू) ५) मैसूर मत्स्यालय (एक्वेरियम) ६) मैसूर राजवाड ७) वृंदावन उद्यान ८) श्रीरंगपट्टणम येथील श्री रंगनाथस्वामी मंदिर ९) इस्कॉन मंदिर यासह दक्षिण भारतातील पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत.

या सहलीचा प्रारंभ बुधवारी ११ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन होणार आहे. युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना संदेश सावंत आणि संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीमुळे शालेय विद्यार्थ्यांना विमान प्रवासासोबतच भारतीय अंतराळसंस्था व दक्षिण भारतातील पर्यटन स्थळांना भेट देता येणार आहे.

विमानाने इस्रो सफारीसाठी निवड झालेली ४ थी, ६ वी व ७ वी इयत्तेतील प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थी – इयत्ता चौथी : १) पियुष लाड १८६ नेरुळ शिरसोस २) स्वरा गुरव १८२ अजगनी नंबर १, ३) रेयांश कोळसुलकर १८२ वेंगुर्ला नं.३ ४) रुंदा आवडन १८० आरोंदा मानसी, ५) आराध्य आपटे १८० सावंतवाडी नं.२

इयत्ता ६ वी : १) रुद्र पिकुळकर १८४ जवाहर नवोदय विद्यालय सांगेली २) प्रारब्ध बर्डे १८४ कुडाळ हायस्कूल कुडाळ ३) वेदा राऊळ १८४ सावंतवाडी नं. ४ ४) डेलिशा सावंत १८४ एस एम हायस्कूल कणकवली ५) अंजली भोसले १८० एस एम व्ही. एम पडेल

इयत्ता 7 वी :
१) आदित्य प्रभूगावकर १८४ ए एस डी टोपीवाला हायस्कूल मालवण २) पार्थ वजे १७२ कुडाळ हायस्कूल कुडाळ ३)सुरभी सावंत १७२ सावंतवाडी नं.४ ४) विराज कल्याणकर १७० कणकवली नं.३ ५) रेवण राऊळ १७० एस एन एम विद्यालय खारेपाटण

यावर्षापासून रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा गुणवत्ता यादीतील निवडक विद्यार्थ्यांना ईस्त्रो सफरीत समाविष्ट करण्यात येणार आहे. पुढील वर्षी ही परीक्षा १८ जानेवारी २०२६ रोजी ११ ते १ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी परीक्षा प्रमुख सुशांत मर्गज ९४२०२०६३२६ यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!