28.9 C
New York
Tuesday, August 5, 2025

Buy now

पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्याचे प्रशासन हाताळण्यात अपयशी – सुशांत नाईक

पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील दोन ठिकाणच्या अपूर्ण ब्रिज कामामुळे गावांचा संपर्क तुटला

दहिबाव – नारिंग्रे ब्रिजच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना घालावा लागणार १० किलोमीटर चा वळसा

देवगड : तालुक्यातील दहिबाव- नारिंग्रे पुलाचे काम अर्धवट, केलेला सर्व्हिस रोड पावसामुळे पाहून गेला. यामुळे नारिंग्रे गावातून आचऱ्याला जाणारा तसेच पलीकडील गावांचा संपर्क यामुळे तुटला आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी या पुलाची पाहणी केली. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे व जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या बेजबाबदार कारभाळामुळे गावातील नागरिकांना हा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. या अर्धवट असलेल्या ब्रिज मुळे नागरिकांना 10 ते 12 किलोमीटर चा वळसा घालून पलीकडील गावात जावे लागणार आहे. त्याच बरोबर काही शेतकऱ्यांची शेती देखील पलीकडील भागात आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना आता शेतीची कामे करण्यासाठी जाताना हा चौऱ्यांशीचा फेरा मारावा लागणार आहे. ज्या प्रकारे पालकमंत्र्यांच्या वरवडे गावातून आचाऱ्याकडे जाणाऱ्या ब्रिज चे काम अश्याच प्रकारे अपूर्ण राहिल्यामुळे आचरा गावाचा संपर्क तुटला त्याच पद्धतीने दहिबाव नारिंग्रे गावातून आचाऱ्याकडे जाणाऱ्या गावांचा संपर्क तुटला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मतदार संघातील दोन ब्रिज चे काम अपूर्ण राहिल्यामुळे नागरिकांचा अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पालकमंत्री यांनी यापूर्वी च जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनेची आढावा बैठक घेऊन या सर्व बाबींनवर उपाययोजना करायला हवी होती. पण पालकमंत्री यांच्या ५ बेजबाबदार पणामुळे प्रशासनाच्या भोंगाळ कारभामुळे हे २ ब्रिज चे काम अपूर्ण राहिले आहे. यामुळे जिल्ह्यातील आपत्ती वेवस्थापन असेल PWD च्या कामांचा भोजबारा उडालेला दिसून येत आहे.

नितेश राणे गेली १० वर्षे या मतदार संघांचे आमदार आहेत, त्यामुळे हे सर्व ४ नियोजन त्यांनी आधी करणे गरजेचे होते. या दहिबाव-नारिंग्रे पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर नोव्हेंबर मध्ये झाली असून देखील हे काम असून पूर्ण का होत नाही, पालकमंत्री यांचे अश्या ढिसाळ नियोजनमुळे पुढील पाच वर्षे असच विकास होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे पालकमंत्री नितेश राणे हे जिल्ह्याचे प्रशासन हाताळण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली. यावेळी देवगड तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, विभागप्रमुख संतोष दळवी, मनोज भावे, लोकेश माणगावकर, राजाराम घाडी, नवनाथ परब, परेश रुंबडे, भगवान घाडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!