अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची माहिती
कणकवली : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी २० मे २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. जयंत नारळीकर यांनी भारताच्या खगोल भौतिकी शास्त्रात चार दशकाहून अधिक कालावधीपासून संशोधन केले. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केले. अशा या प्रतिथयश खगोल शास्त्रज्ञाला बुधवार दिनांक २८ मे, २०२५ रोजी संध्याकाळी ठीक ५:३० वाजता गोपुरी आश्रमाच्या कै. गणपतराव सावंत बहुद्देशीय प्रशिक्षण संकुलात (नाईक पेट्रोल पंपाच्या मागे, वागदे) येथे श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान गोपुरी आश्रम परिवारातर्फे अध्यक्ष प्रा.डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले आहे.