मालवण : भारतीय सैनिकांच्या पराक्रमाबद्दल आणि सन्मानार्थ मालवणवासीयांतर्फे सोमवार, २६ रोजी सकाळी १०:३० वाजता भरड दत्तमंदिर ते मालवण बंदर जेटी असे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवण तालुक्यातील ग्रामस्थांनी या तिरंगा रॅलीत सहभागी होऊन भारतीय सैनिकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करावयाची आहे. आम्ही भारतीय लष्कराच्या सोबत सदैव राहू हा संदेश देण्यासाठी सर्वांनी तिरंगा यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन धोंडू चिंदरकर, विष्णू मोंडकर, राजा गावकर, भाऊ सामंत, संदीप बोडवे, सहदेव साळगावकर यांच्यासह देशभक्त नागरिकांकडून करण्यात आले आहे.