-7.4 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

कनेडी येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

कणकवली : सांगवे – आंबेडकरनगर येथील अमित भिकाजी कांबळे ( वय ४६) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना कनेडी बाजारपेठेतील पिकअप शेड येथे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कनेडी बाजारपेठेतील एका पिकअप शेडमध्ये अमित कांबळे हे बेशुद्धा अवस्थेत पडलेले श्री. काणेकर यांना दिसून आले. त्यांनी कनेडी येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी अमित यांची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे घोषित केले. याबाबत प्रकाश मनोहर कांबळे यांनी खबर दिली. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!