-7.7 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

चिंदर येथे घरावर झाड पडून नुकसान तर आचरा येथे विजेच्या धक्क्याने गाय मृत

आचरा : मुसळधार पावसामुळे आचरा परीसराला चांगलेच झोडपले आहे. शुक्रवारी मुसळधार पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वारयामुळे चिंदर देऊळवाडी येथीलफावस्तीन मायकल लोबो यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे ४८००० हजाराचे नुकसान झाले. तर चिंदर बाजार येथील प्राची परशुराम माने ह्यांच्या अंगणातील मंडपावर रताब्यांचे झाड पडून पत्रे फुटून नुकसान झाले. याबाबत माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर, चिंदर तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

विजेच्या तारांचा शॉक लागून गाय मृत शनिवारी आचरा पारवाडी माळरान येथे गुरुनाथ विठ्ठल आपकर रा. पारवाडी यांची चार महिन्याची गाभण गाय विजेच्या तारा तुटून शॉक लागून मृत झाली. यामुळे आपकर यांचे मोठे नुकसान झाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!