-7.4 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

गिर्‍हाईक म्हणून आला आणि मोबाईल चोरून नेला

कणकवली : शहरातील पमाज सिटी सेंटरच्या बाजूच्या चिकन – मटण सेंटरवर खरेदीला आलेल्या गिऱ्हाईकने मटण विक्रेत्याचा मोबाईलच चोरून नेल्याची घटना रविवार २५ मे रोजी घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील चित्रित झाली आहे. रविवार म्हटले की, खवय्यांचा चिकन – मटणाचा बेत ठरलेलाच असतो. चिकन सोबतच काही खवय्ये कलेजी पेठा, कोंबड्यांचे पाय सुदधा खरेदी करतात. २५ मे रोजी दुपारी २:१५ ते २:३० वाजण्याच्या दरम्यान आलेल्या एका गिऱ्हाईकने कोंबड्यांचे पाय खरेदी केले.

दरम्यान कोणाचेही लक्ष नाही हे पाहून त्या गिऱ्हाईकाने कोणाच्याही नकळत मटण विक्रेत्याचा मोबाईल चोरून आपल्या खिशात घालत निघून गेला. काही वेळाने मटण विक्रेत्याने आपला मोबाईल शोधला असता त्याला मोबाईल सापडून आला नाही. त्याने थेट दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गिऱ्हाईक म्हणून आलेल्या व्यक्तीनेच मोबाईल चोरी केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्या मटण विक्रेत्याने कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. मोबाईल हँडसेट चोरीचा तक्रार अर्जही पोलीस ठाण्यात दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!