-7.7 C
New York
Wednesday, January 28, 2026

Buy now

रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे महेंद्रा थार गाडी हायवेवर पलटी

मुंबई गोवा महामार्ग वेत्ये येथील घटना

पाणी जाण्यासाठी बांधकाम विभागाने उपयोजना करावी अन्यथा घेराव घालू – गुणाजी गावडे यांचा इशारा

सावंतवाडी : गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गावर वेत्ये येथे रस्त्यावर पाणी साचल्याने महेंद्रा थार गाडीचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी धाव घेत वाहन चालकाला बाहेर काढले.

त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने मोठा अनार्थ टळला. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान या अपघातानंतर सरपंच गुणाजी गावडे हे आक्रमक झाले असून तात्काळ बांधकाम विभागाने हायवेवर पाणी साचत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा बांधकाम विभागाला घेराव घालू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!