नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा
कुडाळ : शहरातील पाणीपुरवठा करणारी पाण्याची मुख्य लाइन फुटल्यामुळे कुडाळ शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून मुसळधार पावसामुळे कामत अडथळे निर्माण होत आहेत. कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी शहराला होणारी पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन स्वखर्चाने पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली. तसेच ज्यांना पाण्याची आवश्यकता आहे अशांनी आपल्याशी 9423026646 या क्रमांकावर संपर्क साधावा त्या भागामध्ये टँकरमार्फत पाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, रोहित भोगटे, आबा धडाम, राकेश कांदे, शिवम म्हाडेश्वर, मयूर कुडतरकर, तन्मय सावंत, रोहित सावंत, सागर वालावलकर आदी उपस्थित होते.