23.7 C
New York
Monday, August 11, 2025

Buy now

बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच वाटप कार्यक्रम जाहीर

बांधकाम कामगारांना मिळणार भांडी संच पूर्णतः मोफत

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच वाटप करणेबाबत सहाय्यक कामगार आयुक्त, रत्नागिरी यांच्या सूचनेनुसार व भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर वाटप कार्यक्रम जाहीर झाला असून, ज्या नोंदीत बांधकाम कामगारांना यापूर्वी गृहउपयोगी भांडी संच किट मिळालेले नाही आणि नोंदणी जीवित आहे. अश्या नोंदणी जीवीत असलेल्या बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करण्यात येणार आहे. यानुसार देवगड तालुका दिनांक २२, २३, २४ मे २०२५ ठीकाण देवगड खरेदी विक्री संघ, कुडाळ तालुका २२, २३, २४ मे २०२५ कुडाळ महालक्ष्मी हाॅल गुलमोहर हाॅटेल समोर, सावंतवाडी व दोडामार्ग तालुका दिनांक २५ मे व २७ मे २०२५ सावंतवाडी शहाबुद्दीन हाॅल बस स्टॅट समोर, मालवण तालुका दिनांक २८, २९, ३० मे २०२५ मालवण मामा वरेरकर नाट्यगृह हॉल, वेंगुर्ले तालुका दिनांक ३१ मे व १ जून २०२५ वेंगुर्ले नगर परिषद हाॅल, कणकवली व वैभववाडी तालुका दिनांक ३, ४, ५, ६ जून २०२५ कणकवली नगर पंचायत हाॅल याठिकाणी होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना आवाहन करण्यात येते की, सदर वस्तू रुपी भांडी संच त्या त्या तालूक्याती कामगारांनी आपल्याच ठरलेल्या तालूका ठीकाणी घ्यावे. तसेच गृहपयोगी भांडी संच हे महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम मंडळाकडून पूर्णत: मोफत मिळणार आहे. यासाठी कोणाही व्यक्तीला,एजंटाला अगर संघटनेला पैसे देण्याची गरज नाही. कोणाही व्यक्तीने किंवा एजंटाने भांडी संच किट मिळवून देण्यासाठी किंवा भांडी संच हमीपत्र फार्मसाठी पैशाची मागणी केल्यास, तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन बांधकाम कामगार महासंघ जिल्हाध्यक्ष भगवान साटम यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!